ज्योती क्रांती को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.

JYOTI KRANTI CO-OP. CREDIT SOCIETY LTD.

Our Service

लाॅकर सुविधा (LOCKER SERVICES)

संस्थेने ग्राहकासाठी लाॅकर सुविधा सुरू केली आहे. ग्राहकाकडील सोनेवस्तु, महत्वाचे कागदपत्रे,दस्तऐवज,पैसे, अनमोल वस्तु, सुरक्षित राहाव्यात म्हणून संस्थेने प्रत्येक शाखेमध्ये लाॅकर सुविधा उपलब्ध केली आहे.संस्थेमध्ये ज्यांचे सेव्हिंग खाते /करंट खाते वरती नेहमी करता व्यवहार राहतील त्यांना वार्षिक भाडे आकारले जाणार नाही.

RTGS/NEFT 24 * 7 सेवा उपलब्ध

  • RTGS- Real Time Gross Settlement
  • NEFT - National Electronic Fund Transfer

एन.ई.एफ.टी.व आर.टी.जी.एस.या सुविधा संस्थेमार्फत आपण खातेदारांना देत आहोत.यामध्ये त्वरीत आपल्या शाखेमधून आॅनलाईन पध्दतीने खातेदाराला कोणत्याही नॅशनलाईज बॅंकेच्या खातेदाराच्या खातेवर 15 मिनीटात पैसे पाठवता येतात.

मोबाईल बॅंकींग सेवा

प्रत्येक खातेदाराला आपली के.वाय.सी पुर्ण करून इंटरनेट बॅंकींग व मोबाईल बॅंकींग सेवा सुरू करता येते. यामध्ये सर्व कंपन्यांचे मोबाईल व डीटीएच रिचार्ज,एका खातेवरून दुस-या खातेवर पैसे ट्रान्सफर करणे, आर.टी.जी.एस, एन.ई.एफ.टी, मीनी स्टेटमेंट, बॅलन्स ईन्कवायरी अशा सुविधा घरबसल्या मिळतात.

मीनी ए. टी.एम.

कोणत्याही बॅंकांच्या ए.टी.एम कार्डचे पैसे संस्थेच्या प्रत्येक शाखेमधून खातेदार सहज व विना चार्ज काढु शकतो. तसेच आधार कार्ड मार्फत भारतातील कोणत्याही बॅंकेच्या खातेवर पैसे जमा किंवा नावे करू शकतो. मीनी ए. टी.एम. ची सुविधा कोणताही चार्ज न घेता दिली जाते.

CHEQUE COLLECTION SERVICES

खातेदाराच्या नावाने असलेले कोणत्याही बॅंकेचे रू.50,000 रू पर्यंतचे चेक क्लीअरिंग करून मिळतात.

SMS SERVICE

संस्थेच्या शाखा सकाळी 9:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत सेवा देत आहते. संस्था नेहमी ग्राहकांच्या सेवेसाठी नवनविन उपक्रम राबवित असते. संगणकाच्या युगात इंटरनेटमुळे जीवन गतीशिल झाले आहे.म्हणून संस्थेने नेटबॅकिंग सेवा देण्याचे ठरविले आहे.स्वताचा व्यवहार, बॅलन्स, स्टेटमेंट,इ. एस.एम.एस व्दारे मोबाईलवर तात्काळ माहिती पाहता येईल. संस्थेच्या मुख्यालय व प्रत्येक शाखेत ग्राहकांसाठी दैनंदिन व्यवहाराची माहिती एस,एम,एस.द्वारे पुरविण्याची सुविधा उपलब्ध आहे. सर्व शाखा इंटरनेटने जोडल्या आहेत त्यामुळे कोणत्या ही शाखेत रक्कमेचा भरणा केला किवा रक्कम नावे केली तर एस.एम.एस. द्वारे त्या खातेदारास आपल्या खात्याचा बॅलन्स मोबाईलवर पाहता येईल. दैनिक ठेव खातेदारास त्याने भरणा केल्याचा एस.एम.एस ताबडतोब भरणा केल्याबरोबर येतो. सर्व खातेदारांना महिन्याच्या शेवटी शिल्लक रक्कमेचाही एस.एम.एस पाठविला जातो. खातेदाराच्या मुदत ठेविची मुदत संपल्याचाही एस.एम.एस पाठविला जातो. तसेच नविन स्किम लाॅंच झाल्यास नविन शाखा सुरू केल्यास, खातेदाराच्या वाढदिवसाचे, विविध सण उत्सवांचे शुभेच्छा एस.एम.एस पाठविले जातात.

CORE BANKING SERVICE

ज्योती क्रांती बॅंकेच्या सर्व शाखा आॅनलाईन संगणक प्रणालीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. खातेदार कोणत्याही शाखेमधून आपल्या खात्यावर व्यवहार करू शकतो.

DTH and Mobile Recharge,Electricity and Telephone Bill, LIC Premium Service

अ) मोेबाईल रिचार्ज सुविधा-(Mobaile Service)- इंटरनेटच्या काळामध्ये मोबाईल प्रत्येक व्यक्ती करिता जिवनावश्यक वस्तु बनला आहे. म्हणून संस्थेने मोबाईल रिचार्ज सुविधा आणली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीचे रिचार्ज केले जाते याची सुविधा प्रत्येक शाखेत उपलब्ध आहे.

ब) विजबील,टेेलिफोनबील,एल.आय.सी भरणा-(Telephone bill, Light bill, LIC Service) - संस्थेच्या प्रत्येक शाखेत विजबील, टेलिफोन बील,एल.आय.सी.चे हप्ते यांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजबील हे बीलावरील भरणा करण्याच्या अंतीम तारखेच्या 02 दिवस आधीचेच स्विकारून भरण्यात येतात. टेलिफोन बील भरण्याची सुविधा संस्थेमार्फत दिली जाते. यामध्ये बीलावरिल अंतीम तारखेच्या आतीलच बील स्विकारून भरणा करण्यात येतो. एल.आय.सी चे हप्ते फक्त रू.50000/ रू च्या आतीलच स्विकारले जातात.

क) डि.टी.एच रिचार्ज संविधा-(D.T.H. Recharge service)- विविध कंपनीचे डि.टी.एच रिचार्ज केले जातात. ग्राहकाचा कोणत्या कंपनीचा डिश आहे त्याचा नंबर अचुक घेउनच आॅनलाईन रिचार्ज केले जाते.

DEMAND DRAFT SERVICES

संस्थेमार्फत अॅक्सिस बॅंक,स्टेट बॅंक आॅफ इंडिया,आय.सी.आय.बॅंक अशा अनेक बॅंकांचे डीमांड ड्राफ्ट दिले जातात.

All rights reserved @ Jyoti-Kranti

Feedback