ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना सन 2000 साली करण्यात आली. याच वाटचालीच्या आधारावरती ज्योती क्रांती को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि.जवळा,ता.जामखेड जि.अहमदनगर
संस्थेची स्थापना सन 2010 साली झाली. आजपर्यंत संस्थेच्या 6 जिल्हयामध्ये 48 शाखा आहेत. संस्थेला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या 5 राज्यांचे
कार्यक्षेत्र आहे. लवकरच संस्थेच्या शाखा ह्या इतर राज्यांमध्ये देखील सुरू होणार आहेत. गेल्या 17 वर्षांपासून संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
सतत आॅडीट ‘अ’ वर्ग असणारी व ISO प्रमाणीत असणारी संस्था आहे.
आपल्या सभासदांना योग्य सेवा मिळावी यासाठी संस्थेचे 11 तास कामकाज चालते. वेळ सकाळी 9:00 ते रात्री 8:00 पर्यंत अविरतपणे चालु राहते. ज्योती क्रांती मल्टीस्टेट ही सर्व
बॅंकींग सेवा देणारी एकमेव संस्था आहे. संस्थेच्या सर्व शाखा कोअर बॅंकींग प्रणालीमध्ये जोडलेल्या आहेत. खातेदार कोणत्याही शाखेमधून पैशांची देवाण घेवाण करू शकतात. संस्थेला
आय.सी.आय सी आय (ICICI) बॅंकेमार्फत स्वःत चा IFSC कोड मिळालेला आहे यामुळे भारतातील कोणत्याही बॅंकेमधुन पैसे संस्थेच्या खातेदारांच्या खातेवरती जमा करता येतात.
आमच्या संस्थेचे सर्व कर्मचारी सभासद, खातेदारांना योग्य माहीती देतात. ग्रामीण व शहरी भागामध्ये बॅंकींग क्षेत्राचे कामकाज चालावे यासाठी संस्था सतत कार्य करत असते.
गरजवंतांना कर्ज देण्याचे कामही संस्था करते. समाजातील प्रत्येक गरीब,मागास,दिन दुबळ्यांना सहकार्य करण्यासाठी संस्था सतत अग्रेसर असते व यापुढे देखील राहील. संस्थेच्या
सर्व सभासद, ग्राहक,ठेविदार, कर्जदार व शुभचिंतक यांना शुभेच्छा....
अध्यक्ष: श्री हजारे अजिनाथ
ज्योती क्रांती मल्टीस्टेट