ज्योती क्रांती पतसंस्थेची स्थापना सन 2000 साली करण्यात आली.याच वाटचालीच्या आधारावरती ज्योती क्रांती को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.जवळा,ता.जामखेड
जि.अहमदनगर संस्थेची स्थापना सन 2010 साली झाली. आजपर्यंत संस्थेच्या 6 जिल्हयामध्ये 48 शाखा आहेत. संस्थेला महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात या 5 राज्यांचे
कार्यक्षेत्र आहे.मागील 17 वर्षांपासून संस्थेचे आर्थिक देवाण घेवाणीचे कामकाज चालु आहे.
संस्थेमध्ये कुशल व कार्यतत्पर कर्मचारी वृंद आहे. संस्थेच्या सर्व शाखा आॅनलाईन आहेत.ज्योती क्रांती मल्टीस्टेटचा खातेदार संस्थेच्या 48 शाखेमधून पैसे जमा अथवा नावे करू शकतो. गरजवंत सभासदाला तत्काळ 15 मिनीटांमध्ये सोनेेतारण कर्ज दिले जाते. संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये दैनिक ठेव प्रतिनीधी असुन ते खातेदारांना घरपोच सेवा देतात.
बॅंक आपल्या दारी या तत्वानुसार संस्थेचे कर्मचारी सभासदांना सेवा देतात. संस्थेच्या प्रत्येक शाखेमध्ये मिनी ए.टी.एम बसवलेले आहे. संस्थेला स्वःत चा आय.एफ.एस.सी कोड असल्याने खातेदारांचे खातेवर बाहेरून पैसे येतात,तसेच खातेदार आर.टी.जी.एस /एन.ई.एफ.टी करू शकतात. संस्थेच्या खातेदारांना इंटरनेट बॅंकींग व मोबाईल बॅंकींग ची
सुविधा उपलब्ध आहे.लवकरच संस्था आपल्या खातेदारांना संस्थेचे ए.टी.एम कार्ड देणार आहे.
अशा प्रकारे आपल्या सर्व सभासदांना बँकिंग क्षेत्रामधील सेवा देणारी ज्योती क्रांती को.आॅप.क्रेडीट सोसायटी लि.एक नामांकीत संस्था आहे.